Nigdi: रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुयांची मदत केली आहे. संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या खात्यावर डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा केल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष एस.डी.भालेकर यांनी दिली.

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, त्याचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराने महाराष्ट्रात काही जणांचे बळी गेले आहेत. या लढाईत सर्वांनी एकत्र येण्यासह मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

या पार्श्वभूमीवर फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून संस्थेच्या वतीने कोरोनाविरोधातील लढाईसाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्रिवेणीनगर येथील बँकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यामध्ये एक लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा केला असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष भालेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.