Nigdi : महिला दिनानिमित्त रंगणार ‘नवंकोरं’ हा कविता,गझल व गप्पांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त ‘अनुष्का स्त्री कलामंच व श्री समर्थ युवक प्रतिष्ठान’ यांच्या (Nigdi) वतीने तसेच नगरसेवक तसेच पवना सहकारी बँकेचे संचालक अमित गावडे व अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्ष शर्मिला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवंकोर’ (कवितेच्या सावलीत घडताना) या कविता, गप्पा आणि गझल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम उद्या म्हणजे रविवारी (दि.5) सायंकाळी पाच ते रात्री आठ या कालावधीत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील मनोहर वाढोकर सभागृह येथे पार पडणार आहे. नवंकोरं या कवितेच्या कार्यक्रमाचे सादरीकरण अभिनेत्री स्पृहा जोशी सादर करणार आहेत.

यावेळी आदित्य दवणे, संकेत म्हात्रे व प्रथमेश पाठक हे देखील त्यांच्या कविता सादर करणार आहेत. खास महिलासांठी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात गप्पा, कविता गझल याबरोबरच एका आगळ्या वेगळ्या योग प्रात्यक्षिकाचाही समावेश असणार आहे. यामध्ये चला फिट राहू या हे सदर समर्थ योग केंद्रच्या सेन्हल भिंगारकर या सादर करणार आहेत.त्यामुळे महिलांना मनोरंजन व आरोग्य या दोन्ही बाबी एकाच कार्यक्रमात अनुभवता येणार आहेत.

या (Nigdi) कार्यक्रमाचे नियोजनासाठी वृंदा गोसावी, दिपा चिरपुटकर, गीता कदम, समृद्धी पैठणकर, स्वाती धर्माधिकारी, शामल जम्मा,अनुजा दोशी, शामला खळदकर, उषा गरभे, सुनंदा सुपनेकर यांनी सहाय्य केले आहे. उपस्थितांसाठी खास खाऊ गल्लीचीही सोय करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.