Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच त्याच्या नातेवाईकांना देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी साडेचारच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.

कुणाल यशवंत गायकवाड (वय 19, रा. ओटास्कीम निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा धोत्रे (वय 21), दाद्या पवार (वय 22), विषाल साठे (वय 30), सुरज विटकर (वय 20, सर्व रा. ओटास्कीम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा आणि फिर्यादी कुणाल यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कुणाल ओटास्कीम येथील संजयनगर येथे त्याचे मामा आणि मामी यांच्यासोबत बोलत बसला होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला मारहाण केली. कृष्णा धोत्रे याने कुणाल याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. अन्य आरोपींनी कुणाल याच्या मामा आणि मामीला मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.