BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : ‘राम जन्मभूमी-एक यशस्वी लढा’ विषयावर चारुदत्त आफळे यांचे शुक्रवारी कीर्तन

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील जागेच्या वादाचा निकाल मागील काही दिवसांपूर्वी लागला आहे. या निकालाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच यामागील इतिहास जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘राम जन्मभूमी – एक यशस्वी लढा’ या विषयावर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

ज्ञानप्रबोधिनी विद्यालय प्रांगण, पेठ क्रमांक 25, सिंधुनगर, निगडी येथे शुक्रवारी (दि. 22 नोव्हेंबर) रोजी ही कीर्तनसेवा सादर होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे ही कीर्तनसेवा देणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरण न्यायालयात दाखल होते. या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जाहीर केला आहे. या निकालामुळे राम जन्मभूमीचा कित्येक वर्षांचा वनवास संपला असून लवकरच तिथे भव्य मंदिर उभे राहणार आहे.

याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदीप पाटील यांनी दिली. अधिक माहितीसाठी विकास देशपांडे (9975988551) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3