Nigdi Crime News : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर व गाळा देण्याच्या आमिषाने पाच जणांची सात लाख 62 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – घरकुल चिखली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर व गाळा देण्याचे अमिश दाखवून दोघांनी मिळून पाच जणांची सात लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 3 डिसेंबर 2017 ते 25 डिसेंबर 2018 या कालावधीत ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडला.

आबासाहेब वसंतराव भोसले (वय 49, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे), योगेश विठ्ठल ढोले (वय 31, रा. मांजरी, पुणे. मूळ रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रवींद्र बबन शिंदे (वय 31, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी सोमवारी (दि. 16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी रवींद्र शिंदे, तसेच संतोष सुदाम चव्हाण, गोरक्षनाथ विठोबा गवंड, प्रवीण गावडे, बबन लोंबाटे यांना घरकुल चिखली येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून व्हीआयपी कोट्यातून घर आणि गाळा मिळवून देण्याचे अमिश दाखवले. त्यापोटी फिर्यादी आणि अन्य चार जणांकडून सात लाख 62 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी घर व गाळा न देता पाच जणांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.