Chakan Crime News : बहुळ येथे रोहित्राची तोडफोड

एमपीसी न्यूज –  रोहित्राची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी त्यातील तांब्याच्या तारा लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महावितरण कंपनीचे येथील तंत्रज्ञ किरण अशोक गायकवाड (वय 33, रा. बहुळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या विषयी अधिक माहिती अशी की, बहुळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे 100 के. व्ही. क्षमतेचे रोहित्र आहे. दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड केली. रोहित्रातील ऑईल जमिनीवर सांडून नुकसान करत चाळीस हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा लांबविल्या.

अशा प्रकारच्या चोरीमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. वारंवार या भागात रोहित्रांची तोडफोड केली जाते. संबंधित चोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.