Nigdi: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय जनतेत स्वराज्याची अस्मिता निर्माण करणारे व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करुन तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहूल जाधव आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी मारुती शिंदे, धोकोजी शिर्के आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.