Nigdi : लहान मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – निगडी मधील राहुलनगर येथे लहान मुलांचे भांडण सुरू होते. त्यावेळी भांडण विकोपाला जाऊ नये यासाठी एका महिलेने मध्यस्थी केली. भांडणा-या मुलांना भीती दाखवण्यासाठी त्यातील एका मुलाच्या कमरेचा बेल्ट घेतला. यावरून त्या मुलाच्या वडिलांनी महिलेशी हुज्जत घालत तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 38 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील राहुलनगर येथे दुपारच्या वेळी काही अल्पवयीन मुलांचे भांडण सुरू होते. हे भांडण मिटविण्यासाठी आणि ते विकोपाला जाऊ नये, यासाठी फिर्यादी महिलेने मध्यस्थी केली. भांडणा-या मुलांना भीती दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीच्या मुलाचा बेल्ट हातात घेतला. यावरून आरोपीने महिलेला ‘तू माझ्या मुलाचा बेल्ट का घेतला’ असा जाब विचारला. यातून दोघांची शाब्दिक चकमक झाली. आरोपीने फिर्यादी महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.