Nigdi : बदनामीची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- अनैतिक संबंध आहेत अशी बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेच्या कुटुंबियांना खंडणी मागितली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी शनिवारी (दि. 13) एकाला अटक केली.

समीर चंद्रकांत सुर्वे (वय-30 रा.आंबेगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी हा पीडित मुलीचे लग्न झाल्यानंतरही तिला भेटण्याचा प्रयत्न करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असे. मात्र विवाहिता भेटण्यास नकार देत असल्याने त्याने तिच्या आईला फोन केला. तुमच्या मुलीने माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले आहेत. ते मला लवकर परत करा नाही तर तिचे माझ्याशी लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते अशी बदनामी करेन अशी धमकी दिली. त्यानंतर आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता आरोपी सुर्वे याला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.