Nigdi News: अखेर निगडीतील विद्युत दाहिनीच्या कामास सुरूवात

एमपीसी न्यूज – निगडीतील (Nigdi News) अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या नव्या विद्युत दाहिनीचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. याचीच दखल घेत प्रशासनाकडून निगडीतील विद्युत दाहिनीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.

निगडी अमरधाम स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीवर व परंपरागत लाकडावर अंत्यविधी करण्यात येतो. दररोज किमान 8 ते 10 शवांचा अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यात येतो. यातील 3 ते 4 मृतदेहांचे दहन विद्युत दाहीनीवर करण्यात येते. विद्युत दाहीनीवर एक शव दहन होण्यासाठी सुमारे दोन ते तिन तासांचा अवधी लागतो. या काळात तेथे दुसरे शव अंत्यविधीसाठी आणल्यास अंत्यविधीसाठी तासनतास वाट पहावी लागते. नव्या विद्युत दाहिनीचे काम ‘कल्याणी एंटरप्रायझेस’ या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानुसार काही महिने त्यांनी काम चालू केले मात्र, गेल्या सात महिन्यापासून काम रखडले होते.

Dighi : भेटायला बोलावून घेत ओळखीच्याच दोघांनी तरुणाला लुटले

महापालिका व ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे (Nigdi News) अंत्यविधीसाठी येणा-या मृताच्या नातेवाईकांना, नागरीकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खडतर जीवनप्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी जनसंवाद सभा, सारथी हेल्पलाईन तसेच महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच सदर विद्युत दाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करून ती विद्युत दाहिनी अंत्यविधीसाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर विद्युत दाहिनीच्या उर्वरीत कामास सुरुवात करण्यात आली असल्याने येत्या काही दिवसांत विद्युत दाहिनी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.