Nigdi News : संस्कार भारती संगीत विद्यालयाच्या गायकांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन (Nigdi News) कार्यक्रमात संस्कार भारती संगीत विद्यालयाच्या सहभागी गायकांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले.

प्राधिकरणातील सावरकर सदनमध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रमात संस्कार भारती संगीत विद्यालयाचे सहभागी गायक नादमयी पोरे कुलकर्णी व ज्ञान प्रबोधिनीच्या गुरुकुलमधील बाल कलाकार, तसेच तबला वादक मिलिंद लिंगायात, संवादिनी वादक स्वरेशा पोरे कुलकर्णी या सर्वांनी मिळून कार्यक्रमास उंची प्राप्त करून दिली.

‘ने मजशी ने परत मातृभूमिला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते जयोस्तुते, हे हिंदु नृसिंहो प्रभो शिवाजीराजा, जयदेव जयदेव जय जय शिवराया अशा अनेक तात्यारावांच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने जमलेल्या श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उमटले, उपस्थितांना स्फुर्ती मिळाली. पंढरपुरे यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा उत्तमरित्या सांभाळली.

याप्रसंगी सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वानाथ नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी सर्व सहभागी कलाकारांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सांगता ‘अखिल हिंदू विजयध्वज हा उभारुया पुन्हा’, या गीताने झाली. या कार्यक्रमास सावरकर प्रेमी, विद्यार्थी, ज्येष्ष्ठ नागरिक, सावरकर मंडळाचे पदाधिकारी, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, शब्दरंग कला साहित्य कट्टयाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देशपांडे यांनी केले.

Dehuroad : कंपनीचा माल आणि टेम्पोसकट साडे चार लाखांच्या ऐवजासह चालक पसार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.