Nigdi News : ‘आयआयसीएमआर’तर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत वेबिनार

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत एमसीए विभागामार्फत ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऍज ऍन इनेबलर फॉर टिचर्स इन इम्प्लिमेंटिंग एनइपी 2020 इन हायर एज्युकेशन’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. भारतीय शिक्षण मंडळ आणि नीती आयोग यांच्या सहयोगाने शनिवारी (दि. 13) ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाप्रसंगी डायरेक्टर-एमसीए आयआयसीएमआर डॉ. दीपाली सवाई, विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू, रिसर्च हेड व कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रिया देशपांडे आणि विविध महाविद्यालयांतील शिक्षक वर्ग सहभागी झाले होते.

डॉ. दीपाली सवाई यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करून शिक्षण व्यवस्था लवचिक होण्याच्या दृष्टिने बनवण्यात आलेल्या बहुवैविध्य व बहुभाषिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आढावा घेतला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते महेश दबक, सदस्य, नीती आयोग भारत सरकार यांनी ‘रोल ऑफ टिचर्स इन इम्प्लिमेंटिंग एनइपी 2020’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रादेशिक भाषांतून शिक्षणाची व्यवस्था, ऐच्छिक शिक्षण आयोग, हायर एज्युकेशन कॉउंसिल ऑफ इंडिया याबद्दल माहिती दिली. सध्याच्या डिजिटल शिक्षण पद्धतीतील शिक्षकांची मार्गदर्शक म्हणून बदलती भूमिका यावर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. आदित्य अभ्यंकर, डायरेक्टर -स्कुल ऑफ टेक्नोलॉजी, प्राध्यापक- तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऍज ऍन इनेबलर फॉर टिचर्स इन इम्प्लिमेंटिंग एनइपी 2020 इन हायर एज्युकेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. क्रिएटिव्ह थिंकींग आणि कल्पकता व संशोधनपर वृत्ती विकसित करण्यावर भर देण्यास सांगितले. पेटंट आणि कॉपीराइटच्या निर्मितीचे महत्त्व तसेच प्राचीन गुरूकुल पध्दतीचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्व अभ्यंकर यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यातील आव्हाने व उपाय यावर मायक्रोसॉफ्ट टीम्स मध्ये ब्रेक आऊट रूम्सच्या माध्यमातून उपस्थित शिक्षक वर्गामध्ये चर्चा करण्यात आली. समारोप करताना रिसर्च हेड व कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रिया देशपांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची वैशिष्ट्ये, आव्हाने आणि त्यावरचे उपाय यांचा संक्षिप्त आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले. किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.