Nigdi News : प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचा पडदा कधी उघडणार?

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह (Nigdi News) बांधण्यास जानेवारी 2015 मध्ये सुरूवात झाली. नाट्यगृहाचे काम जुलै 2022 अखेर बांधून पूर्ण झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये नाट्यगृह असेच बांधून तयार आहे. सध्या एप्रिल 2023 उजाडला तरी नाट्यगृहाचे उद्घाटनासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न रसिक प्रेक्षक व कलावंत विचारत आहेत.

शहरामध्ये जी चार नाट्यगृहे आहेत त्यांच्या तोडीचे हे एकमेव नाट्यगृह असणार आहे. हे नाट्यगृह शहरातील इतर नाट्यगृहांपेक्षा वेगळे आहे. यामध्ये एक मिनी थिएटर, अ‍ॅम्पी थिएटर, हॉल, कलादालन असे मल्टिप्लेक्स सारखे असे हे थिएटर आहे. प्राधिकरणामध्ये नाटकाचा रसिक आहे. हे नाट्यगृह सुरू झाल्यास एक चांगली गोष्ट होईल.

कारण महापालिकेच्या सध्या सुरु असलेल्या नाट्यगृहांमध्ये काहीना काही समस्या आहेत. शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या व्यतिरिक्त खासगी कार्यक्रम जास्त होत असतात. त्यामुळे नाट्यकलावंतांना व कलाकारांना कला सादरीकरणास शहरात वाव मिळत नाही. कित्येक कलाकार सरतेशवेटी पुण्याला प्राधान्य देतात.

Pimpri News: विद्यार्थ्यांना गंभीर आजाराने ग्रासले

नाट्य कलाकारांना नाटकांच्या तालिमीला जागा नाही. कला सादरीकरणासाठी एखादे छानसे कलादालन असावे अशी शहरातील कलावंताची इच्छा आहे आणि त्याची प्रतीक्षा ही ग.दि.मा नाट्यगृहातून पूर्ण होणार आहे. मात्र, नाट्यगृहाचे काम पूर्ण ( Nigdi News) होऊनही उद्घाटनासाठी किती प्रतीक्षा पहावी लागणार माहिती नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.