Nigdi : कॅशियरच्या नकळत ऑफिसबॉयनेच मारला बँकेतील रोकडवर डल्ला

एमपीसी न्यूज – बँकेतील सीनियर कॅशियर सोबत काम करताना ऑफिस बॉयने बँकेच्या रोख रकमेमधून वारंवार पैसे काढत एक लाख 35 हजार रुपयांचा अपहार केला. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकुर्डी शाखेत घडला.

कार्तिकेयन चिन्नायन (वय 39) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऑफिस बॉय संदीप श्रीधर जाधव (वय 32, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या निगडी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. बँकेत काम करणारा ऑफिस बॉय आरोपी संदीप याने सीनियर कॅशियर श्रद्धा बिबिकर यांच्यासोबत काम करत असताना कॅशियर रूममध्ये रोख रकमेचे बंडल पॅक करत असताना त्यातून वारंवार पैसे काढले. या पैशांचा वापर त्यांने स्वतःच्या फायद्याकरता केला. एकूण 1 लाख 35 हजार रुपयांची त्याने बँकेची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.