Nigdi: पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

Nigdi: Two arrested for carrying pistol शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना सापळा लावून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली.

एमपीसी न्यूज – दोन पिस्तुल आणि चार काडतूस बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.1) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुर्गा चौक, निगडी ते थरमॅक्‍स चौक दरम्यान करण्यात आली.

सोमनाथ भारत शिंदे (वय 26, रा. जय बजरंग हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) आणि मंगेश सुनील झुंबरे (वय 28, रा. केसनंद फाटा, वाघोली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार दीपक महादेव खरात यांनी शनिवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे आणि झुंबरे हे दोघेजण दुर्गा चौक ते थरमॅक्‍स चौक या दरम्यान असलेल्या हुंदाई शोरुमजवळ येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना सापळा लावून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपींची दुचाकीसह एक लाख 52 हजारांचा ऐवज जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.