Nigdi : दोन लाखांची घरफोडी; अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) निगडी प्राधिकरण येथे सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

सुनीत गोपीनाथ चेट्टी (वय 42, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण मधील पेठ क्रमांक 27 मध्ये प्रणव व्हिला हा बंगला आहे. शनिवारी (दि. 7) रात्री साडेअकरा ते रविवारी (दि. 8) सकाळी साडेसात या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातून 64.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीन हजर रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.