Nighoje News : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू,मर्सिडीज बेंज कंपनीजवळील घटना  

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला आहे. निघोजे हद्दीतील मर्सिडीज बेंज कंपनीजवळ शुक्रवारी (दि. 22) पहाटे 4. 45 वा ही घटना घडली.

शंकर गंगाधर भावणदगे (वय 27, रा. निघोजे, ता. खेड) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे.
रेवणाप्पा सुर्यकांत शिवपुजे (वय 28, रा. निघोजे, खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शंकर भावणदगे हे मर्सिडीज बेंज कंपनी जवळील रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने भरधाव गाडी चालवत शंकर यांना जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शंकर भावणदगे यांनी उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भावणदगे यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.