Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीच्यावतीने उद्या होणार नवव्या रनेथॉन होप अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे दि. 13 जानेवारी (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे नवव्या रनेथॉन ऑफ होप 2019 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी रनथॉनचे डायरेक्टर अण्णारे बिरादार यांनी दिली.

या मॅरेथॉनला महाराष्ट्र ऍथलेटिक असोसिएशनने राज्यस्तरीय स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. या स्पर्धेची सुरुवात महापौर बंगला प्लॉट भेळ चौकाजवळून सकाळी पावणे सहा वाजता होणार आहे. ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी  वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. मुले-मुली तसेच स्त्री-पुरुष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडेल.

या स्पर्धेमध्ये 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या स्त्री व पुरुषांना पाच किलोमीटर, 10 किलोमीटर व 21 किलोमीटर यामध्ये खुला सहभाग आहे. या वर्षी 45 वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या स्पर्धकांना वेगळी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. धर्मादाय स्पर्धा दोन किलोमीटरची असून कंपन्यांसाठी स्पर्धा पाच किलोमीटरची आहे. या स्पर्धेत एकूण 4 लाख 15 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे प्रायोजकत्व सिस्का एलईडी, सँडविक एशिया, टाटा मोटर्स, एसकेएफ इंडिया, इमरसन, एनप्रो, टीजेएसबी, हॉटेल डबल ट्री हिल्टन व थरमॅक्स आदींनी स्वीकारले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.