NMMS Scholarship : मॉडर्न प्रशालेतील आठ विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजने (NMMS) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत मॉडर्न प्रशालेतील आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

यातील अभिनव गेजगे आणि सुप्रिया साळवे या दोघांना 48 हजार रुपयांची, तर यादव केतकी, जाधव आदिती, पाटील शर्वरी, उमाटे श्रेया, सावंत हार्दिक,धामणे श्रावणी या विद्यार्थ्यांना 38,400 रुपयांची स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना आशा कुंजीर आणि मीना अधिकारी या दोन शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, तसेच पर्यवेक्षिका वर्षा पाचरणे तसेच नियामक मंडळ सदस्य राजीव कुटे यांनी देखील मार्गदर्शन केले.

 

MPC News Online Bappa : सत्यम ज्वेलर्सच्या वतीने पाच विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान

 

मुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे, संस्थेचे कार्यवाहक शामकांत देशमुख, संस्था कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.