Pimpri News : ‘फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करा’;काशिनाथ नखाते यांची महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज  – पिंपरी – चिंचवड शहरातील फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील साधारण 3200 पेक्षा अधिक पथ  विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण  महापालिकेच्या चुकीमुळे झालेले नव्हते. हे न करता महापालिकेकडून त्यांच्यावरती अन्यकारक कारवाई सुरू होती, ही कारवाई थांबवा.त्यांनाही  बायोमेट्रिक सर्वेक्षण करून फेरीवाला प्रमाणपत्र द्यावे या  इतर मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यानंतर  उच्च न्यायालयाने सन 2012 आणि 14  मध्ये ज्यांचे  सर्वेक्षण झाले आहे अशा विक्रेत्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जुलै  ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वेक्षण करण्याची मुदत  देऊन सर्व ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’,  ‘ई’, ‘फ’, ‘ग’ आणि  ‘ह’ सर्व क्षत्रिय कार्यालयांना सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. मात्र क्षेत्रीय कार्यालयाकडून केवळ टाळाटाळ केली जात आहे. गरीबांना  वंचित ठेवण्यात येत आहे.महापालिकेकडून ज्याची नावे क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली. त्यांचा सर्वेक्षण करणार असे सांगून उर्वरीत  सर्वेक्षण केले जात नाही आणि त्यांच्याकडे  कार्यालयांकडे महापालिकेकडून फक्त 70, 80, 90 एवढेच नावे एका प्रभागांमध्ये  पाठवले  असल्याने हे जाणून बुजून सर्वेक्षण टाळण्यात येत आहे. गरजूंना वंचित ठेवले जात आहे. क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी हे फेरीवाल्यांना टाळत आहेत आणि सर्वेक्षण आता होणार नाही असे म्हणून सांगत आहेत. आम्ही तुम्हाला फोन केल्याशिवाय ऑफिसला यायचं नाही अशा प्रकारच्या सूचना देऊन परत पाठवत आहेत. हे अत्यंत चुकीचे  असून कायद्याचा व न्यायालयाचा  अवमान करणारे आहे.

Today’s Horoscope 14 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आता सुमारे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आठही क्षेत्रीय कार्यालय मिळून फक्त 200 सर्वेक्षण झालेले  असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आपण लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्याला तातडीत सूचना द्याव्या. या सर्वेक्षणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या भूमी जिंदगी विभाग व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, फरीद शेख, किरण साडेकर, अंबादास जावळे, यासीन शेख आदींनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.