जनजागृतीचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध राजकीय नेते, नामवंत डॉक्टर्स आणि सेलिब्रिटीजचे व्हिडीओ बाईट्स घेण्यात आले. विषाणू पसरू नये ह्यासाठी घ्यावयाच्या काळजी बरोबरच ‘घाबरू नका पण सावध रहा’ हा त्यामध्ये मुख्य संदेश होता. अभिनेता भरत जाधव, भार्गवी चिरमुले, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, संजय मोने, विद्याधर जोशी, सुकन्या कुलकर्णी तसेच खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे तसेच पालिकेच्या विविध डॉक्टर अधिकाऱ्यांसह निरामय रुग्णालयाचे डॉ. श्रीरंग गोखले, धन्वंतरी रुग्णालयाचे डॉ. सुधीर पाटील आदींचा त्यात समावेश होता.