moshi news: मोशी बी आर टी रोड कडेने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी पाईपलाईन टाकल्यानंतर डांबरीकरण न केल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास

एमपीसी न्यूज : मोशी मधील बी आर टी रोड कडेने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर डांबरीकरण न केल्याने गेली दोन महिने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होत असून अपघात पण होत आहेत.

देहू- आळंदी बी आर टी रोड हा देहू व आळंदी या दोन तीर्थक्षेत्राना जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकसित केला आहे. याचा काही भाग मोशी गावाच्या हद्दीतून जातो. मोशी मधील बी आर टी रोड वरील भारत माता चौक ते आळंदी पर्यंत असलेल्या 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याकडेने गॅस लाईन टाकण्या साठी रस्ता खोदण्यात आला होता. पाईपलाईन टाकण्याचे काम दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाले असले तरी त्यावर डांबरीकरण अद्याप पर्यंत करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होत असून अपघात पण होत आहेत.

Economic Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाला घटनात्मक चौक – अजित पवार

याबाबत प्रा राजेश दत्तात्रय सस्ते, चेअरमन, अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. भोसरी व संस्थापक अध्यक्ष, वेदिक विजडंम् एज्युकेशनल ट्रस्ट, मोशी म्हणाले की संपूर्ण दगड खडी वर आली आहे खड्डे पडले आहेत. दुचाकी या खडी वरून घसरत असून अपघात होत आहेत. त्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत.

मॉर्निंग वॉल्क ला येणाऱ्या महिला, पुरुष व लहान मुले यांचा जीव धोक्यात आला आहे. वाहनांच्या टायर खालून दगड उडून लागल्याने लोक जखमी होत आहेत.तसेच पादचारी व वाहने ही खडी टाळण्यासाठी रस्त्याच्या मधून छोट्या जागेतून जातात त्यामुळे अपघात होऊन पादचारी जखमी होऊ शकतात.

तसेच कार्तिकी एकादशी यात्रे निमित्त तीर्थ क्षेत्र आळंदी नगरी कडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक भक्त येतात. त्यांना सुद्धा पायी चालणे अवघड झाले आहे. मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वारी करणारे भाविक तसेच स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण त्वरित करावे अशी मागणी सस्ते यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.