Pimpri : ‘स्मार्ट सिटी’ नसून ‘स्मार्ट व्हिलेज’

एकाच परिसरातील रस्ते, शाळांवर खर्च; संचालकांची टीका 

एमपीसी न्यूज  – स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच भागातील रस्ते, शाळांवर करोडो रूपये खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ नसून हा प्रकल्प ‘स्मार्ट व्हिलेज’ असल्याची टीका स्मार्ट सिटीचे संचालक असलेले शिवसेनेच्या प्रमोद कुटे यांनी केली. तसेच केवळ 154 स्वच्छातागृह बांधण्यासाठी 10 कोटी 50 लाखाचा खर्चावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. 

स्मार्ट सिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, सचिन चिखले उपस्थित होते. प्रायोगिक तत्वावर केवळ पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर, म्हेत्रे वस्ती याच भागातील पालिकेच्या शाळांमध्ये म्युनिसिपल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येत आहे. शहरातील इतर भागातील शाळांवर हा अन्याय आहे. एकाच भागातील 22 किलो मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल अडीचशे कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट सिटी कसे न म्हणता स्मार्ट व्हिलेज असे म्हणावे, असे प्रमोद कुटे म्हणाले.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार स्मार्टचा निधी इतर भागासाठी खर्च करता येत नाही. तर, मग  महापालिकेच्या समोर मेट्रोच्या दहा खाबांचे सुशोभिकर करण्यासाठी साडेपाच कोटी रूपये खर्च करण्याचा विषय अजेंड्यावर कसा आला? असा सवाल साने यांनी उपस्थित केला. त्यामुळे हा विषय बैठकीत तहकूब करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.