Talegaon DabhadeNews : आता 5 रुपयात तळेगाव दाभाडे येथे नमो थाळी

बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने श्री राम नवमीचे औचित्य साधून सायंकाळच्या नमो थाळीचा उपक्रम सुरू केल्याने सर्वसामान्य, गोरगरीब व रूग्णांच्या नातेवाईकांकडून स्वागत होत आहे. 

माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या जिजामाता चौक व तळेगाव स्टेशन येथील कार्यालया समोर 5 रुपयात नमो थाळी उपक्रमाचे उद्घाटन बुधवार (दि.21) सायंकाळी  7 वा. पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष अॅड रवींद्र दाभाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गटनेते अरूण भेगडे, नगरसेविका निता काळोखे, माजी शहराध्यक्ष व नगरसेवक संतोष दाभाडे, शहराध्यक्ष रविंद्र माने आदींच्या  हस्ते करण्यात आले.

या नमो थाळीला सायंकाळचा वेळ दिल्यामुळे पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाॅकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून जर लॉकडाऊन वाढला तर नमो थाळी उपक्रम लॉकडाऊन मध्ये सुरूच राहणार असे पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे व नगरसेवक संतोष दाभाडे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे  म्हणाले शहरात  रुग्ण संख्या वाढत असुन सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांची या लॉकडाऊन मध्ये गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दुपारी  एकवेळ जेवणाची थाळी जनसेवा विकास समितीच्यावतीने व सप्तशृंर्गी महिला बचत  गटाच्यावतीने  उपलब्ध झाली आहे. म्हणून आम्ही पक्षाचे वतीने सायंकाळी नमो थाळी उपलब्ध करून देत आहोत. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केल्याचे भेगडे यांनी यावेळी  सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा उपक्रम सायंकाळी  7 ते रात्री 9 वा. यावेळेत सुरु असणार आहे. प्रत्येकी रोज तीन चपात्या, एक भाजी व मसाला भात तसेच पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात येणार आहे. लवकरच मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली नमो थाळीचा उपक्रम सुरू करणार असल्याचे गणेश भेगडे यांनी सांगितले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक काळोखे, सुनील भेगडे, सुरेंद्र दाभाडे, संतोष लोणकर, अजय भेगडे, प्रदीप गटे, विनायक गं भेगडे, रवींद्र  भोसले, श्रीमती रजनी ठाकूर, शोभा परदेशी, मोहिनी भेगडे, तनुजा दाभाडे, अनिल वेदपाठक, नितीन पोटे, सचिन जाधव, सागर शर्मा, निर्मल ओसवालसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.