Chinchwad News : पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाकडून दररोज कडक कारवाई होत असूनही शहरात विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी मास्क न वापरणाऱ्या 410 नागरिकांवर कारवाई केली.

शासनाने यापूर्वीच लॉकडाऊन आणि गुरुवारी (दि. 22) रात्री पासून आणखी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत यातून सूट दिली. मात्र रस्त्यावरील गर्दी काही केल्या कमी होत नाही.

कारवाई करण्यासोबतच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांच्या मदतीने कोरोना चाचणी केली जात आहे. त्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्या नागरिकांवर योग्य ते उपचार देखील केले जात आहेत.

गुरुवारी सुमारे सव्वाशे नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात सात ते आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आसपास राजरोसपणे फिरत असल्याने सर्वांनी आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे.

गुरुवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई –

एमआयडीसी भोसरी (66), भोसरी (16), पिंपरी (13), चिंचवड (23), निगडी (35), आळंदी (20), चाकण (23), दिघी (23), सांगवी (22), वाकड (54), हिंजवडी (05), देहूरोड (28), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (07), चिखली (13), रावेत चौकी (18), शिरगाव चौकी (25), म्हाळुंगे चौकी (09)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.