Nupur Sharma : जामा मशिदीबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन; मशिदीच्या शाही इमाम यांचा पाठिंब्याला नकार

एमपीसी न्यूज : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर मुस्लिमांचा विरोध सुरू झाला. शुक्रवारी नमाजानंतर मुस्लिम समाजाने दिल्ली, कोलकाता, प्रयागराज, सहारनपूर, जम्मूसह अनेक ठिकाणी निदर्शने केली. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जमावाने दगडफेक केल्याच्या देखील घ टना समोर आल्या आहेत.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मात्र, काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ठिकठिकाणी नमाज झाल्यानंतर नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते.

निदर्शनास परवानगी नव्हती?

जामा मशिदीच्या शाही इमाम (Nupur Sharma) यांनी सांगितले की, मशीद समितीने निदर्शनास परवानगी दिली नव्हती. एएनआयशी बोलताना शाही इमाम म्हणाले, ‘कोण विरोध करत आहेत हे आम्हाला माहीत नाही. मला वाटते की ते AIMIM चे आहेत किंवा असदुद्दीन ओवेसीचे लोक आहेत. आंदोलन करायचे असेल तर करू, पण पाठिंबा देणार नाही, असे आम्ही स्पष्ट केले होते.

दिल्ली पोलिस करणार कारवाई? 

डीसीपी (मध्य जिल्हा) श्वेता चौहान यांनी सांगितले की, ‘सुमारे दीड हजार लोक शुक्रवारच्या नमाजसाठी जामा मशिदीत जमले होते. नमाजनंतर सुमारे 300 लोक बाहेर आले आणि नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या प्रक्षोभक भाषणाचा निषेध करू लागले. आम्ही 10-15 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. परवानगीशिवाय रस्त्यावर निदर्शने करण्यात आली, त्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईल.

Saurav Mahakal : सौरव महाकालने सांगितला सलमान खान धमकी प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन

दिल्लीमधून AIMIM च्या 30 आंदोलकांना अटक

दिल्ली पोलिसांनी एआयएमआयएम पक्षाच्या 30 कार्यकर्त्यांना आंदोलनादरम्यान दंगलीसह विविध आरोपांखाली अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. गुरुवारी राजधानीत निदर्शने करण्यात आली.

यूपीमध्ये शुक्रवारी अलर्ट

कानपूरमध्ये (Nupur Sharma) शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून कानपूरमध्ये गदारोळ झाला होता. दहशतवादी संघटनांकडून वातावरण बिघडवण्याची धमकी दिल्यानंतर सर्व जिल्ह्यात पोलीस सतर्क झाले आहेत.

मेरठ, मुरादाबाद, सहारनपूर, अलीगढ विभागांमध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शांतता समितीसह धार्मिक नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. असुरक्षित जिल्ह्यांमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, अलीगड, मुरादाबाद, बरेली, रामपूर, सहारनपूर, बिजनौर आणि बुलंदशहर यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.