Alandi News : आळंदी नगरपरिषदेच्यावतीने इंद्रायणी नदी घाट गणेश मूर्ती विसर्जनासाठी बंद

एमपीसी न्यूज – गणेश मुर्ती विसर्जनासाठी आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट बंद ठेवण्यात आला आहे.

गणेश भक्तांनी आपल्या जवळील मूर्ती खेड विभागकडील नगरपरिषद वाहनतळ, हवेली विभागाकडील इंद्रायणीनगर कमानीसमोर या  ठिकाणच्या मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती संकलित /दान  करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना  करण्यात आले आहे.

आळंदी येथील  इंद्रायणी नदी घाट परिसर लाकडी बांबू व पत्राच्या सहाय्याने बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.