Pune : सोमवारी पुण्याच्या ‘या’ भागात राहणार पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विविध (Pune) भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम सुरु असल्याने येत्या सोमवारी (दि.20) चांदणी चौक टाकीच्या मागे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकीला येणाऱ्या 1 हजार मि.मी. ची रामलिंग मेन लाईन लिकेज असून त्या लाईनचे दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे WTP वरून चांदणी चौक पंपिंग स्टेशन बंद राहणार असून परिसराला पाणी पुरवठा केला जाणार नाही.

यामध्ये पाणी पुरवठा बंद असणारा भाग – 

बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्री नगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे बस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, अंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.

Pune News : पुणे कस्टम्सने उधळून लावले गांजा तस्करीचे रॅकेट; 54 किलो गांजा जप्त

वारजे WTP: अहिरेगाव, अतुल नगर परिसर, (Pune) वारजे माळवाडी, गोकुळ नगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर., कोंडवे धावडे, उत्तम नगर, कोपरी, शिवणे

या भागाचा सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारी (दि.21) सकाळी कमी दाबाने परिसराला पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी यांची नोंद घेत सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.