Pune : पुण्यात 53 व्या विजया दिनानिमित्त तब्बल 53 तासांच्या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

एमपीसी न्यूज : भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने 53 व्या विजय दिवसाच्या (Pune) स्मरणार्थ पुण्याच्या ऐतिहासिक रेसकोर्सवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे 2 वाजता कडाक्याच्या थंडीत चोवीस निवडक स्पर्धकांनी 53 तासांच्या अल्ट्रा मॅरेथॉनला सुरुवात केली. भारतीय लष्कर 1971 च्या विजयी दिवसाचा यंदा 53 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

ही विलक्षण दौड 14 डिसेंबरच्या पहाटे 2:00 वाजता सुरू झाली असून या दौडीचा 16 डिसेंबर रोजी सकाळी 7:00 वाजता समारोप होणार आहे. रेसकोर्स पुणे येथे ही अनोखी अल्ट्रा मॅरेथॉन 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या दृढनिश्चयाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केली आहे.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

53 तासांची ट्रिब्यूट रन 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या दक्षिणी स्टार विजय रनची प्रस्तावना म्हणून (Pune) काम करणार आहे. या ठिकाणी लेफ्टनंट जनरल ए के सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, आर्मी कमांडर, सदर्न कमांड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

11 राज्यांमधील 23 ठिकाणी एकाच वेळी किमान 50,000 धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग अपेक्षित आहे. या मॅरेथॉनला  अल्ट्रा मॅरेथॉन प्रेरणा देणारी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.