Tukaram Beej : संत तुकाराम बीजच्या निमित्ताने देहू नगरीत वारकऱ्यांची अलोट गर्दी

एमपीसी न्यूज : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो..(Tukaram Beej) या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झालेत.आज 375 वी तुकाराम बीज आहे.

तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केलं त्या स्थळावर नांदुरकी नावाचं  वृक्ष आहे. तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असं सांगितलं जातं.  त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वारकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचे बीज सोहळ्याचे 375 वे वर्षे आहे. या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते.(Tukaram Beej) पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली.

Budget 2023 : मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार

सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

या बीजोत्सवासाठी शेकडो वारकरी देहूत दाखल झाली आहेत. कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही मात्र मागच्या वर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. (Tukaram Beej) यंदाही या दैदीप्यमान सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल झाले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालं आहे. हताश असलेला शेतकरी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुढची शेती सुजलाम होऊ दे असं साकडं घालणार आहेत. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. येणारं वर्ष नीट जाऊदे असं म्हणत तुकोबा चरणी शेतकरी विलिन होणार आहे. भाजनांनी सगळा परिसर दुमदुमला आहे.

या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलिस आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 25 सहायक पोलिस निरीक्षक, 130पोलिस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात 50 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.