Chinchwad : गर्दीचा गैरफायदा घेत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – चौकात असणाऱ्या गर्दीचा फायदा (Chinchwad) घेत महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या नराधमाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

स्वप्नील रविंद्र शेळके (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पीडितेने बुधवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.25) चिंचवडेनगर येथील दगडोबा चौक येथे घडला आहे.

Toll Plaza : वाहनचालकांशी सौजन्याने वागा; पोलिसांच्या टोल नाक्यावरील कर्मचा-यांना सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकत असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीशी गेरवर्तन करत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच फिर्यादीला व त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.