Chikhali Crime News : ऑनलाईनद्वारे ओटीपी विचारून 25 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत असलेल्या लहान मुलास अनोळखी इसमाने लिंक पाठवून रजिस्टर करण्यास सांगून ओटीपी मिळविला व 25 हजार रूपये खात्यामधून काढून घेऊन फसवणूक केली.

कैलास भिकाजी गवळी (वय 45, रा. सार्थ स्नेहसदन, राजगड पार्क, मोरे वस्ती चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पंजाब नॅशनल बँकेच्या अज्ञात खातेधारक व अज्ञात मोबाईल धारक इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरोपी पंजाब नॅशनल ब्यँकेचे 0606010230216 खातेक्रमांक असलेल्या व 07384806563 हा मो. क्र. असलेल्या अनोळखी व्यक्तिने 14 फेब्रु 2022 रोजी फिर्यादीच्या मो. क्र. वर एक लिंक पाठविली. लहान मुलाच्या हातात मोबाईल असल्याने त्याने लिंकवर रजिस्टर केले. त्यानंतर आलेला ओटीपी आरोपीने मिळविला. त्यानुसार फि र्यादीच्या खात्यामधून आरोपीने 25 हजार रूपये काढून घेतले. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.