Wakad Crime News : महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका व्यक्तीने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री सात ते आठ आणि शनिवारी (दि. 29) दुपारी दोन वाजता व्हाट्स अप या सोशल मीडियावर घडली.

प्रकाश तुळशीराम शर्मा (रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला पैसे दिले होते. ते पैसे परत न केल्याने आरोपीकडे फिर्यादी यांचे पूर्वीचे असलेले अर्धनग्न फोटो त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या व्हाट्सअपवर पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांना अश्लील मेसेज करून अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्या मानस लज्जा निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार महिलेला अडवून भर रस्त्यात विनयभंग

दुचाकीवरून जाणा-या महिलेच्या दुचाकीला कार आडवी लावून तिला कारमध्ये बसण्याची जबरदस्ती केली. महिलेने नकार दिला असता तिला मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि. 29) दुपारी तीन वाजता नेरेगाव येथे गणपती मंदिराच्या समोर घडली. आकाश उमाकांत गुरव (वय 24, रा. वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.