Pimpri Corona Update : रविवारी शहरात 2133 नवीन रुग्ण; 4369 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 30) दिवसभरात 2133 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 4369 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 46 हजार 986 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 23 हजार 680 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 19 हजार 474 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 18 हजार 974 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 500 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 5 हजार 930 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 32 लाख 70 हजार 225 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.