BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंपनीतून एक लाखांची कॉपर कॉइल चोरीला

0

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून एक लाख रुपयांची कॉपर कॉईल चोरून नेली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. ५) सकाळी नऊ वाजता खालूंब्रे येथील डिजिटल सर्किट्स प्रा. लि. या कंपनीत उघडकीस आला.

नवनाथ शंकर जाधव (वय ५०, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव खालूंब्रे येथील डिजिटल सर्किट्स प्रा. लि. नावाच्या कंपनीत काम करतात. मंगळवारी (दि. ४) रात्री सहा ते बुधवारी (दि. ५) सकाळी नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून एक लाख रुपये किमतीची कॉपर कॉईल चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like