Pune : अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

आनंदनगर बीट मार्शलची कामगिरी

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलिसांनी अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी एका युवकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.

रोहित उर्फ किट्या दत्ता जाधव, (वय 19, हिंगणे खुर्द, पुणे), असे या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर बिट मार्शल पोलिसांना पेट्रोलिंग करताना त्यांच्या बातमीदारामार्फत हिंगणे खूर्द, महादेवनगर येथे पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातलेला काळा-सावळा युवक कंबरेला पिस्टल सारखे हत्यार घेऊन संशयास्पद रित्या बसलेला आहे, अशी माहिती मिळाली. बिट मार्शलने ही माहिती तातडीने वडगाव पोलिसांना सांगितली.

मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी महादेव नगर येथे पडताळणी केली असता. आरोपी रोहित हा तिथे संशयास्पद रितीने फिरताना आढळला. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्याच्याकडे याचा परवाना नव्हता. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.