PF Nomination : भविष्य निर्वाह निधी वारस नोंदणीसाठी ऑनलाईन ‘ई-नॉमिनेशन’ प्रक्रिया   

एमपीसी न्यूज – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सदस्यांनी वारस नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यामुळे सदस्याचा मृत्यू झाला तर, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतनाचा लाभ त्यांच्या कुटुंबीयांना देता येतो. यासाठी नॉमिनेशनचा फॉर्म-2 प्रत्यक्ष देण्याऐवजी ई-नोमिनेशनची सुविधा EPFO ने सुरू केली आहे.

वारस नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया आधार कार्डशी निगडित असून, यासाठी सदस्याचा मोबाइल नंबर व आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे.

वारसनोंदणीसाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा

– ईपीएफओच्या वेबसाइटवर यूएएन व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

unifiedportal.mem.epfindia.gov.in

– ‘view’ टैब वर क्लिक करून परत ‘Profile’ वर क्लिक करा Jpg/jpeg फारमेट मध्ये (100kb) पेक्षा कमी आपला फोटो अपलोड करावा. त्यामध्ये कायम / स्थायी पत्ता सुद्धा बदलू शकता.
– त्यानंतर ‘Manage’ टॅब वर क्लिक करून ‘E-nomination’ ऑप्शन वर क्लिक
– त्यानंतर आपणास यूएएन, नाव, जन्म तारीख, लिंग, वडील / पतीचे नाव, विवाहित / अविवाहित, पत्ता, कंपनी मध्ये पीएफ़ व ईपीएस चे Date of Joining स्क्रीन वर दिसेल. त्यानंतर ‘profile’ वर क्लिक करा व ‘Yes’ वर क्लिक करून फॅमिली डिटेल्स अपडेट करू शकता. सदस्य एकापेक्षा जास्त नॉमिनी percentage नुसार अपडेट करू शकतो.
– त्यानंतर ‘add family details’ वर तुम्हाला ज्या व्यक्तीला नॉमिनेट करावयाचे आहे त्यासाठी सदस्याला आधार नंबर नाव & जन्म तारीख, नातेसंबंध, नॉमिनीचा पत्ता, बैंक डिटेल्स व नॉमिनी चा फोटो अपलोड करावा लागतो. त्यासाठी ‘Add Row’ ला क्लिक करा.
– त्यानंतर ‘Nomination details’ वर जर एक असेल तर 100% आणि एकापेक्षा
जास्त असेल तर त्यानुसार टक्केवारी नुसार % देऊ शकता.
– त्यानंतर ‘save EPF nomination’ बॉक्स वर क्लिक करावे. त्यानंतर आपण sign बटन वर क्लिक करून आधार नंबर किंवा VID (virtual id आधारची) वर क्लिक करून ओटीपी generate करावा, जो आपल्या रजिस्टर्ड आधार कार्डच्या मोबाइल वर जातो.
– आधार ची e-sign फॅसिलिटी आपणास ईपीएफओ वर रजिस्ट्रेशन साठी उपयुक्त पड़ते ज्यामुले आपण पेंशन क्लेम फ़ाइल करू शकतो. ज्यावेळेस सदस्याचा मृत्यु होतो त्या देऊ वारसदाराला त्याच्या आधार वरुन क्लेम दाखल करता येतो. त्यासाठी वारसदाराला कंपनी किंवा कंपनी मालकाकडे जाण्याची आवश्यकता नसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.