Maval News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितिन घोटकुले यांच्या माध्यमातुन भारतीय जनता पक्ष, ओवळे यांच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या स्पर्धेचा विषय ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा असून ओवळे येथील भाजप सोशल मीडियाचे अध्यक्ष अक्षय भालेराव, भाजप सोशल मीडिया चांदखेड गणचे अध्यक्ष अजित शिंदे आणि ओवळे येथील भाजपचे युवा नेते महेश साठे हे आयोजक आहेत.
स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे –
1) वरिल विषयावर 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवून पाठवावा.
2) व्हिडिओ पाठवताना स्वत:चे संपूर्ण नाव  पाठवावे.
_MPC_DIR_MPU_II
3) व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारिख 17 सप्टेंबर 20 सायं- 9.00 वाजेपर्यंत असेल.
4) यामध्ये  पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व मुलामूलींना सहभाग घेता येऊ शकतो.
या स्पर्धेचा निकाल 20 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल, यावेळी स्पर्धेतून 3 विजेते काढण्यात येणार असून या विजेत्यांना आकर्षक बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठीचे व्हिडिओ, अजित शिंदे (9021425508)  अक्षय भालेराव (7620573826) या क्रमांकावर पाठवावेत. तसेच जास्तीत जास्त मुलामूलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.