Pune : राज्यातील मंदिरांची द्वारेही उघडा : मनसे

एमपीसी न्यूज – राज्यातील मंदिरांची द्वारेही आता उघडा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील कार्यवाही करण्याच्या गृहविभागला सूचना देण्यात आल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात सध्या सगळ्याच गोष्टीना सुरवात झाली आहे. सर्व प्रकारची दुकाने चालू झाली आहेत. घरातून बाहेर पडलो तर रस्त्यावर गर्दी दिसते. मोल-मजुरी करणाऱ्या परप्रांतीय मंडळीसाठी गाड्याही सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन सगळ्या गोष्टीही मिळू लागल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दारूची दुकाने तर दोन – पाच किलोमीटरच्या रांगा लावून सुरू आहेत. सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकानाबाहेर चार – पाच पोलीस रांगा लावताना दिसत आहेत. असं सगळं सुखद चित्र दिसत असताना आणि या सगळ्या सुरु असणाऱ्या गोष्टी मुळे कोरोनाचा प्रसार होत नसताना आणि बऱ्या पैकी जनताच करोनाचा प्रसार होऊ नये, या साठी काळजी घेत आहेत.

योग्य त्या नियम, अटी घालून देत राज्यातील मंदिरे देखील मुक्त केली पाहिजे. याबाबत योग्य ते निर्णय त्वरित घ्यावे, अशी विनंती मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.