Vadgaon Maval : भाजपच्या कार्यकाळातील मंजूर विकासकामांच्या भूमिपूजनाची व उद्धाटनाची संधी विरोधकांनी घ्यावी

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

strong>एमपीसी न्यूज :  “भाजपच्या सत्ताकाळात मंजूर झालेल्या तालुक्यातील सर्व विकासकामांच्या भूमीपूजनाची व पुर्ण झालेल्या कामांच्या उद्धाटनाची संधी विरोधकांनी घेऊन विकासकामे पुर्णत्वास न्यावीत अन्यथा पुढील काही दिवसांतच या कामांची उद्घाटने भाजपच्या कार्यकर्त्यांनाच करावी लागतील” अशी मिश्किल टिप्पणी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी येथील प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका सुनिता भिलारे यांच्या प्रयत्नातून झालेल्या रस्त्याच्या लोकर्पणसोहळ्या प्रसंगी व्यक्त केली.

येथील  स्थानिक नगरसेविका सुनिता भिलारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मधील 21 लक्ष रुपये निधीतून पहिल्या टप्प्यात झालेल्या काँक्रीट रस्ता,बंदिस्त ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन इत्यादी विकासकामांचे लोकार्पण भेगडे यांच्या हस्ते शुक्रवार (दि 26) करण्यात आले. पुढील आठवड्यात 15 लक्ष रु. खर्चून प्रभागातील आणखी एका रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मावळ भाजपचे प्रभारी,भास्कराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात, “विकासकामांच्या  उदघाटन प्रसंगी वडगाव शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने  नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते, आपण आता एका पक्षाचे नसून संपूर्ण शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून काम पहात आहात.हे कायम स्मरणात ठेवून निपक्षपाती काम केले पाहिजे ” असे मत व्यक्त केले.

 याप्रसंगी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी  सुवर्णा ओगले, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहर अध्यक्ष किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, दिलीप म्हाळसकर,दीपाली मोरे,दशरथ खेंगले,प्रसाद पिंगळे,शामराव ढोरे,  माजी अध्यक्ष नारायण ढोरे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर,सुधाकर ढोरे, माजी सदस्या शांता भिलारे,गणेश भेगडे,  ज्येष्ठ नेते किसन भिलारे, वसंत भिलारे,सोमनाथ काळे,खंडूशेठ भिलारे,युवक अध्यक्ष रमेश ढोरे,रविंद्र म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर आदींसह,कार्यकर्ते व प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी कल्पेश भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.विनायक भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.