Pimpri : पिंपरीमध्ये श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरीमध्ये (Pimpri) माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Pavana Dam update :  पवना धरणात 93 टक्के पाणीसाठा

कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन शनिवार दिनांक ५ व ६ ऑगस्ट तसेच कै. सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सोहळ्याचे आयोजन दिनांक ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. कथेचे निरुपण संगीता येनपुरे-चोपडे करणार आहेत.

झी टॉकीज प्रस्तुत गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाअंतर्गत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ ते २, दुपारी ३ ते ६,सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये होणार आहे तसेच दिनांक ७ ऑगस्ट रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तसेच कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट, सावता सेवक ट्रस्ट, राजेंद्र वाघेरे, हरिष वाघेरे, भाऊसाहेब राक्षे, ऋषिकेश वाघेरे,  रंजना जाधव करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.