Chinchwad : डायमंड जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध शिबिरांचे आयोजन

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडमधील डायमंड जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त चिंचवडस्टेशन येथील जैन वर्धमान स्थानक येथे रविवार, 1 एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिर, औषध वाटप, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अध्यक्ष सुनील शहा यांनी दिली.

आनंदनगर, साईबाबानगर, येथील 140 गरजू महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात 24 जणांनी रक्तदान केले. याशिवाय 25 जणांनी अवयवदान व नेत्रदानाचे अर्ज भरले. जैन सोशल ग्रुपतर्फे चालविण्यात येणा-या एज्युकॉन या शैक्षणिक मदत उपक्रमासाठी दोन लाख चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा झाली. गोग्रास या गायींसाठी चारा या उपक्रमासाठी सात हजार पाचशे रुपयांची देणगी गोळा झाली. डॉ. सुजाता फुलपगर यांच्या भक्तामर अनुष्ठानाचा सुमारे 200 जणांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी चिंचवडस्टेशनच्या जैन वर्धमान स्थानकाचे अध्यक्ष सुरेश गादिया विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजकुमार जैन व कमलेश चोपडा यांनी केले. सहाय्य अध्यक्ष सुनील शहा, सचिव अतुल धोका व इतर सहका-यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा जैन यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.