Pandharpur vitthal Mandir : प्रकाश आंबेडकर करणार ‘विठ्ठल मंदिर प्रवेश’ आंदोलनाचे नेतृत्व

आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा ; 31 ऑगस्ट रोजी प्रकाश आंबेडकर स्वत: उतरणार मैदानात

एमपीसी न्यूज – पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पुन्हा उघडण्यात यावं या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसोबत मिळून मंदिर प्रवेश आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असून आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून देशात आणि राज्यात लॉकडाऊन अंतर्गत विविध आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमधून काही गोष्टी वगळल्या असल्या तरी राज्यातील सर्व मंदिरं अद्याप बंद आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पुन्हा उघडण्यात यावं अशी मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

31 ऑगस्ट रोजी पढंरपूर येथे होणा-या वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असून मी स्वत: या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.