Panvel : खासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करा, खासदार बारणे यांची पनवेल महापालिका आयुक्तांना सूचना

Reserve beds in private hospitals, MP Barne instructs Panvel Municipal Commissioner

एमपीसी न्यूज – पनवेल महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. प्रशासनाने नियोजनपूर्वक काम केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात रुग्ण वाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तयारी करावी. आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करावेत, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केल्या.

खासदार बारणे यांनी पनवेल शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा बुधवारी (दि.17) पालिका मुख्यालयात आढावा घेतला. पनवेल शहरातील कोरोनाची सद्यपरिस्थीती काय आहे. किती रुग्ण आहेत. याची सविस्तर माहिती घेतली.

बैठकीला महापौर डॉ. कविता चोतमल, आमदार प्रशांत ठाकूर, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ. सुनील शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामनाथ शेवाळे उपस्थित होते.

पालिकेने उभारलेल्या 100 खाटांची सुविधी असलेले कोरोना कोविड सेंटरची पाहणी केली. देण्यात येणा-या सुविधांची माहिती घेतली. त्याबाबत विविध सूचना केल्या.

खासदार बारणे म्हणाले, कोरोनाच्या काळात पनवेल महापालिका प्रशासनाने चांगले काम केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.

सध्या 254 सक्रिय रूग्ण आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना आपल्यातून गेला नाही. त्यामुळे सतर्कता राहून काळजी घ्यावी.

आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात रुग्ण वाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तयारी सुरु करावी. प्रादुर्भाव वाढत असेल. तर, खासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करावेत.

जास्तीत-जास्त नागरिक एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सुरक्षित अंतराचे पालन करावे. सम-विषय तारखेत दुकाने चालू ठेवावीत. प्रादुर्भाव वाढणार नाही. याची दक्षता घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.