Pawana nagar : पवना विद्या मंदिर शाळेला आय.एस.ओ मानांकन

ग्रामीण दुर्गम भागातील पहिली आय.एस.ओ मानांकन शाळा

एमपीसी न्यूज – पवनानगर येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचालित पवना विद्यामंदिर आणि पवना ज्युनियर कॉलेजला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. पवना शाळा ही परिसरातील 25 गावांसाठी महत्वाची मानले जाते. विद्यालयात बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण दुर्गम भागातील पहिली आय.एस.ओ मानांकन शाळा आहे.

पवना विद्या मंदिर शाळेची स्थापना 1969 साली झालेली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील सर्व सुविधांनी युक्त शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळा सुशोभीकरणासाठी अध्यापकवर्ग नेहमी कार्यरत होते आणि शाळेला आयएसओ मानांकन मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे आणि सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाने एप्रिल २०१८ पासून शाळेतील सर्व अध्यापकांनी सर्व प्रकारे प्रयत्न करून शाळेत अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या.

स्पर्धा परीक्षा, तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले. आधुनिक संगणक कक्ष, इ-लर्निंग हॉल, सभागृह, मैदान, प्रयोगशाळा, बोलक्या भिंती, सूचना फलक या सर्व गोष्टींमुळे शाळेस आयएसओ मानंकन प्राप्त झाले.

ग्रामीण दुर्गम भागातील एकमेव आयएसओ मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा झाल्याने तालुक्यातील सर्व स्तरांतून शाळेचे कौतुक होत आहे. आयएसओ मानांकनासाठी शाळेचे परीक्षण लक्ष्मीकांत साधू यांनी केले.

यावेळी बोलताना खांडगे म्हणाले की, सुरवातीच्या काळात शाळा सिमेंट पत्राशेड मध्ये भरविण्यात येत होती परंतु संस्थेच्या प्रयत्नातून माणेकलाल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ जूहू यांच्या सहकार्यातून शाळेला सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर काही अशक्य नसते हे सिद्ध होते. पवनानगर सारख्या दुर्गम ग्रामीण भागातील पहिली आय. एस. ओ मानांकन दर्जा प्राप्त झाला.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, शालेय समिती अध्यक्ष व संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार सुरेश शहा यांनी शाळेचे प्राचार्या प्रिती जंगले आणि पर्यवेक्षिका नीला केसकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

शाळेला आय.एस.ओ मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव संतोष खांडगे,संचालक सोनबा गोपाळे यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा यावेळी उपस्थित सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.