PCMC : पिंपरी चिंचवड मनपाची मोई फाटा येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीतील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 2, जाधववाडी कुदळवाडी, चिखली, देहू, आळंदी रस्त्यालगतच्या मोई फाटा येथील गट नंबर 14 व 15 येथील 22000 स्क्वेअर फुट एरियाचे 44 अनधिकृत कमर्शियल पत्रा शेड व 2000 स्क्वेअर फुट एरियाचे 1 अनधिकृत कमर्शियल आरसीसी बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
PCMC
आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जितेन्द्र वाघ यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण व अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई करण्यात येत असून शनिवारी ही कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.

PCMC
प्रशासन अधिकारी (PCMC) नाना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, बीट निरिक्षक प्रसाद आल्हाट, योगेश शेवलकर व ‘क’ प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.