PCMC : हिवाळी अधिवेशनासाठी समन्वय अधिका-यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – विधीमंडळच्या 7 डिसेंबरपासून (PCMC) नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनाकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समन्वय, सहाय्यक समन्वय अधिका-यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाचे सन 2023 चे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबरपासून सुरु होत आहे. विधीमंडळात तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, इतर प्रश्न विधानमंडळ सचिवालयाकडून महापालिकेस प्राप्त होत असतात. त्यानुसार विधीमंडळ कामकाज प्राधान्याने व विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे.

प्रशासकीय विषयक कामकाजासाठी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांची समन्वय तर सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांची सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Maharashtra : महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावणाऱ्या एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

अभियांत्रिकी विषयक कामकाजासाठी शहर अभियंता मकरंद निकम यांची समन्वयक तर उपअभियंता देवेंद्र बोरावके यांची (PCMC) सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. समन्वय अधिका-यांनी हिवाळी अधिवेशन कालावधीमध्ये शासनामार्फत पारीत होणा-या सूचना, सर्व निर्देशांचे पालन करावे. अधिका-यांनी यापूर्वी सोपविलेल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून विषयांकीत कामकाज करावे असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.