Ind v Aus T-20 : ट्वेंटी-20 उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात बदल; विश्वचषकातील खेळाडू मायदेशी परतणार

एमपीसी न्यूज – विश्वचषकानंतर भारतामध्ये (Ind v Aus T-20 )ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 5 ट्वेंटी-20 सामने खेळवले जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील अंतिम सामना रंगला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावे केले.

त्यानंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 ट्वेंटी-20 सामन्याची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत विश्वचषकात सहभागी असलेले खेळाडू देखील सहभागी असून या खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात बदल केला आहे.
5 ट्वेंटी-20 सामन्याच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या संघात मोठे बदल केले आहेत. विश्वचषकात सहभागी खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी उर्वरित 3 सामन्यात दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

 

त्यानुसार स्टीव्ह स्मिथ, अॅडम जम्पा, मार्कस स्टॉईनिस, जॉस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, शोन एबट यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जॉश फिलीप, बेन डॉरशिस आणि क्रिस ग्रीन यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. स्टीव्ह स्मिथ, अॅडम जम्पा हे दोघे आज मायदेशी परतणार आहेत तर मार्कस स्टॉईनिस, जॉस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, शोन एबट हे खेळाडू उद्या 29 नोव्हेंबर रोजी मायदेशी रवाना होतील, याबाबतची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

PCMC : शहरात फक्त 1136 अधिकृत जाहिरात फलक, यापुढे…

आज भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा ट्वेंटी-20 सामना गुवाहाटी येथे रंगणार आहे. भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकेत वर्चस्व प्राप्त केले आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारत तिसऱ्या विजयासह मालिका खिशात घालणार की ऑस्ट्रेलिया पहिला विजय मिळवून मालिकेला रोमांच कायम ठेवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.