PCMC : शहरात फक्त 1136 अधिकृत जाहिरात फलक, यापुढे…

एमपीसी न्यूज – किवळे दुघर्टनेनंतर पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील 174 अनधिकृत जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत फक्त 1 हजार 136 जाहिरात फलक अधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. यापुढील काळात शहरात अनिधकृत फलक आढळल्यास ते फलक जमीनदोस्त केले जातील, असा इशारा आकाश चिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.

महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत दोन वेळा बाह्य जाहिरात धोरण तयार करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. मात्र, 2022 मधील राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवे धोरण स्वीकारण्यात आले. महापालिकेचे पूर्वीचे धोरण रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, 17 एप्रिल 2023 रोजी किवळे येथे अनधिकृत जाहिरात फलक कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला. तर, 3 जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील 174 अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Akurdi : खंडोबा माळ ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला

न्यायालयाने नियमानुसार असलेल्या जाहिरात फलकांना परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, त्या जाहिरात फलक (PCMC) व्यावसायिकांकडून आवश्यक कागदपत्रांसह परवाना शुल्क भरून घेण्यात येत आहे. शहरात सध्या 1 हजार 136 जाहिरात फलक अधिकृत आहेत. यापैकी 861 जणांनी नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत.

नूतनीकरणासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे. अर्जात जाहिरात फलकाचा आकार 40 फूट बाय 20 फूट आहे. मात्र, प्रत्यक्षात फलक , नियमानुसार फलकावर नंबरचीपाटी, क्यूआर कोड नसल्यास, लोखंडी फलक जमिनीखाली व वर गंजलेले किंवा सडलेले असल्यास त्या फलकाला परवानगी न देता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.