Thergaon : जॉब ऑफर देत तरुणाची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जॉब ऑफर देत अनोळखी व्यक्तींनी टास्क पूर्ण (Thergaon)करायला भाग पाडत तरुणाची तीन लक 96 हजारांची फसवणूक केली. ही घटना 15 आणि 16 एप्रिल रोजी थेरगाव येथे ऑनलाईन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना (Thergaon)अनोळखी क्रमांकावरून जॉबची ऑफर आली. त्याला फिर्यादींनी संमती दिल्यानंतर त्यांना सुरुवातीला काही टास्क देण्यात आले. ते पूर्ण करताच त्यांच्या खात्यावर 3100 रुपये पाठवण्यात आले. आपण टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतात, असे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.

PCMC : हिवाळी अधिनेशनासाठी समन्वय अधिका-यांची नियुक्ती

त्यानंतर त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर दुप्पट फायदा होईल, असे सांगून त्यांना टास्कमध्ये तीन लाख 96 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. पैसे भरून टास्क पूर्ण केल्यानंतर देखील त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच त्यांनी गुंतवलेली रक्कम देखील परत मिळाली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.